नांदेड(प्रतिनिधी)-ढवळे कॉर्नर ते किवळा रस्त्यावरील बिजली हनुमान मंदिराजवळ एक तांदळाने भरलेला ट्रक जळाला त्यात झोपलेल्या ड्रायवरचा सुध्दा कोळसा झाला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यू दाखल केला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोंदिया येथून तांदुळ भरलेला ट्रक क्रमांक एम.एच.40 बी.जे.9604 हा काल दि.26 मार्च रोजी रात्री 9 वाजता नांदेड शहरात पोहचला. गाडीत एक चालक नितीन सटवाजी कांबळे (30) रा.हळदा ता.कंधार आणि दुसरा सहकारी नांदेडच्या सिडको भागातील होता. सिडको भागातील व्यक्तीने गाडी थांबवून नितीन कांबळेला थोडा आराम करा मी घरी जावून येतो असे सांगितले. या ट्रकला चाकूरला जायचे होते. आपला ट्रक बिजली हनुमान मंदिराजवळ लावून चालक नितीन सटवाजी कांबळे हे त्या ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपले. कोणास माहित नाही की, आग कशी लागली पण आग लागली आणि ट्रकने पेट घेतला. ट्रकमध्ये झोपलेले नितीन कांबळे यांचाही जळून कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक उत्तम बुक्तरे, पोलीस अंमलदार जावेद, गव्हाणकर घटनास्थळी पोहचले त्यांनी अग्नीशमन दलाला बोलावून घेतले आणि आग आटोक्यात आली. पण दरम्यान गाडीत झोपलेल्या नितीन कांबळे यांचा मृतदेह झाला होता. नांदेड ग्रामीण पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 31/2022 दाखल केला या बाबतचा पुढील तपास पोलीस अंमलदार शेख जावेद यांच्याकडे देण्यात आला आहे.
बिजली हनुमान मंदिराजवळ ट्रक पेटून झोपलेल्या ट्रक चालकाचा मृत्यू