नांदेड(प्रतिनिधी)-मौजे चांडोळा ता.मुखेड येथे एका घराच्या शेजारी उगविण्यात आलेले गांजाचे झाड मुखेड पोलीसांनी पकडले आहे. या गांजाच्या झाडाचे वजन 7 किलो 690 ग्रॅम आहे.
मुखेड तालुक्यातील चांडोळा गावातील एका घराजवळ अंमलीपदार्थ गांजाचे एक झाड उगविण्यात आले असल्याची माहिती मुखेड पोलीसांना मिळाल्यानंतर मुखेड पोलीसांनी तेथे छापा टाकला. हे घर कपील गंगाराम गायकवाड (26) यांचे होते. तेथे उगविण्यात आलेल्या गांजाच्या झाडाचे एकूण वजन 7 किलो 690 ग्रॅम आहे. या गांजाची किंमत 38 हजार 450 रुपये आहे. पोलीस उपनिरिक्षक गजानन दत्ता काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुखेड पोलीसांनी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम 20(अ)(ब) प्रमाणे गुन्हा क्रमांक 96/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास मुखेडचे पोलीस निरिक्षक व्ही.व्ही.गोबाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. आज दि.29 मार्च रोजी मुखेड न्यायालयाने गांजा पिकवणाऱ्या आरोपीला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
चांडोळा ता.मुखेड येथे 7 किलो 690 ग्रॅम गांजा पकडला