नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील हैद्राबाद रस्त्यावर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला फोडून चोरट्यांनी 4 लाख 32 हजार रुपये किंमतीच्या 48 ऍमरॉन बॅटऱ्या चोरून नेल्या आहेत.
शंकर व्यंकटराव शिंदे यांचे नांदेड हैद्राबाद रस्त्यावर गुरू कृपा बॅटरी दुकान आहे. त्यांच्याकडे ऍमरॉन या बॅटरी कंपनीची एजन्सी आहे. दि.27 मार्चच्या सायंकाळी 6 ते 28 मार्चच्या पहाटे 8.30 वाजेदरम्यान त्यांच्या दुकानाचे शटर उचकून त्यातून 48 ऍमरॉन बॅटऱ्या किंमत 4 लाख 32 हजार रुपयांच्या कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 90/2022 कलम 457,380 भारतीय दंड संहितेप्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संजय निलपत्रेवार हे करीत आहेत.
4 लाख 32 हजारांच्या ऍमरॉन कंपनीच्या 48 बॅटऱ्या चोरल्या