नांदेड(प्रतिनिधी)-एका अनोळखी 25 ते 30 वर्षीय व्यक्तीने मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला बाहेरून दोरीबांधून आत्महत्या केली आहे.
नांदेड येथून दररोज सकाळी 10 वाजता तपोवन एक्सप्रेस ही गाडी मुंबईकडे रवाना होते. आज 30 मार्चची पहाट झाल्यानंतर फलाट क्रमांक 3 वर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस या गाडीच्या बाहेर डब्यातील शौचालयाच्या खिडकीला एका 25 ते 30 वर्षीय अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या युवकाने निळी पॅन्ट आणि पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे. लोहमार्ग पोलीसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. मयत युवकाच्या तपासणीत कोणतेही रहिवासी पुरावे सापडून आलेले नाहीत. लोहामार्ग पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विजया मेलफेदेवार यांच्याकडे या आकस्मात मृत्यूचा तपास देण्यात आला आहे.
लोहमार्ग नांदेडचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांनी जनतेला
तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास घेवून अनोळखी युवकाची आत्महत्या