नांदेड(प्रतिनिधी)-अमेरिकन चलनातील एक बिलीयन डॉलरची नोट 50 लाखांना विक्री करण्यासाठी आलेल्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल झाला. मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी त्या तिघांनादोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील दोन जण पळून गेले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या पथकाला गुरूद्वारा गेट नंबर 1 जवळील बडपुरा भागात पाठविले. तेथे पोलीस पथकाने चार चाकी गाडी क्रमांक टी.एस.17 जी.2045 मध्ये बसलेल्या लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यातील दोन जण पळून गेले. पकडलेल्या लोकांची नावे महेश ईल्लया वेल्लूटला (30) रा.सर्वापुर गांधारी जि.कामारेड्डी ,नंदकिशोर गालरेड्डी, देवारम(42) रा.पोचम्मागल्ली इब्राहिमपेठ,आनंदराव अयन्ना गुंजी(32) रा.नेपूरनबाबू तेलंगणा अशी आहेत. या बाबत वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 91/2022भारतीय दंड संहितेच्या कलम 399 प्रमाणे दाखल केला. ही तक्रार स्थानिक गुन्हा शाखेचे सात वर्षापासून अनुभवी, अभ्यासू सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती यांनी दिलेली आहे. या तक्रारीमध्ये हे तीन जण एक बिलियन अमेरिकन डॉलरची नोट, भारतीय चलनात ही किंमत 750 कोटी रुपये होते. एवढ्या मोठ्या किंमतीची नोट 50 लाख रुपयांना विक्री करण्याच्या उद्देशाने हे तीन आरोपी तेथे थांबलेले होते. या तिघांना पडण्यात आले असून दोन जण फरार आहेत. वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 91 चा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
आज 30 मार्च रोजी संजय निलपत्रेवार, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे, व्यंकट गंगुलवार,विजय नंदे यांनी या तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर विदेशी चलनाची बनावट नोट खरी आहे असे दाखवून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तिन जणांना पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे दिली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.एस.खलाने यांनी या तिघांना दोन दिवस अर्थात 1 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.