नांदेड(प्रतिनिधी)-गुढीपाडव्याच्या पुर्व संध्येवर आज एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. उपचार घेत असलेल्या एकाची मुक्तता झाली आहे. आज उपचार घेणारा रुग्ण सुध्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे कोरोना संपला असे लिहिले तर ते चुकीचे ठरणार नाही.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आलेल्या प्रेसनोटनुसार आज 717 कोरोना अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यात 707 निगेटीव्ह अहवाल आहेत. 10 स्वॅब नाकारण्यात आलेले आहे. त्यामुळे एकही नवीन रुग्ण सापडला नाही. तसेच नांदेड मनपा गृहविलगिकरणात उपचार घेणाऱ्या एकाचा रुग्णाची सुट्टी झाली आहे आणि त्यामुळे एकही रुग्ण उपचार घेणारा सुध्दा शिल्लक राहिलेला नाही. अशा पध्दतीने आजच्या परिस्थितीत कोरोना संपला असेच लिहावे लागेल.