नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या वयोमानानुसार 31 मार्च रोजी दोन पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि तीन पोलीस हवालदार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सहपत्नीक त्यांचा सन्मान करून त्यांना निरोप देतांना आम्ही आहोत तुमच्यासाठी असा संदेश दिला.
काल दि.31 मार्च रोजी भोकर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक गोपाळ गोविंदराव रांजनकर, माहूर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक विलास माहादेव जाधव, पोलीस ठाणे लिंबगाव येथील पोलीस उपनिरिक्षक अमृता महादेव केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रमेश रामदास जाधव-किनवट, इकराम उल्ला अहमदुल्ला सय्यद-गु.स.पथक, सुरेश नारायण पुरी -नांदेड ग्रामीण, दादाराव विठ्ठलराव केंद्रे-नायगाव, पोलीस हवालदार बालाजी लाकडोजी भंगर्गे-लोहा, रामदास ज्ञानोबा तिडके आणि रमेश गंगाधर संकुरवार-पोलीस मुख्यालय नांदेड हे आपल्या विहित वयाप्रमाणे पोलीस सेवेतुन सेवानिवृत्त झाले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात सभागृहात पोलीस प्रमुख प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्विनी जगताप यांनी या दहा सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना सहकुटूंब सन्मान करून त्यांना पोलीस खात्यातून निरोप देतांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले की, आम्ही आहोत तुमच्यासाठी. या कार्यक्रमात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, आनंद नरुटे, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस कर्मचारी, इतर शाखांमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी केले. सुत्रसंचालन पोलीस अंमलदार रुपा कानगुले यांनी केले.
दोन पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस उपनिरिक्षक आणि 7 पोलीस अंमलदार सेवानिवृत्त