नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक माझे कांहीच वाकडे करू शकत नाही, मी दोन जणांचा गोळीबार करून, ऐनकाऊंटर करून त्यांना ठार केले आहे. अशी धमकी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब अनुसूचित जातीच्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षकांना देत असल्याचे पत्र त्यांनी वास्तव न्युज लाईव्हला दिले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक प्रदीपकुमार नामदेवराव जोंधळे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचे घर यशोधरानगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था म.वसरणी येथे आहे. या संस्थेचे चेअरमन एन.पी.गायकवाड, सचिव आर.एस.भास्करे यांनी नियमबाह्य रित्या या जागेत भुखंड तयार करून ते विक्री केल्याबाबत कांही सदस्यांनी तसा अर्ज उपनिबंधक कार्यालय आणि पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दिला तरी सुध्दा त्यांच्याविरुध्द कांही कार्यवाही केली नाही. उलट सचिव आर.आर.भास्करेने दिलेल्या तक्रारीवरुन माझ्याविरुध्द आणि मधुकर तुकाराम चौदंतेविरुध्द 13 मार्च 2022 रोजी अश्लिल शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार 24 मार्च रोजी दाखल केली. भ्रष्ट पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी तक्रारीची कांही शहानिहाश करता आमच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
28 मार्च रोजी सचिव आर.आर.भास्करे, डी.के.हनमंते हे यशोधरानगरमधील मोकळ्या जागेतून जात असतांना मी, संभाजी रामचंद्र तारू, मधुकर तुकाराम चौदंते हे तेथे बसलो असतांना सायंकाळी 5.30 वाजता भास्करेने एक पांढरी मोठी रुमाल माझ्या गळ्यात टाकून एकीकडून भास्करे आणि दुसरीकडे हनमंते यांनी तो रुमाल पकडून मला गळफास देवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संभाजी तारू, मधुकर चौदंते यांनी सोडवासोडव केली म्हणून मी वाचलो. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जावून अर्ज दिला असता मी त्यांच्यावर कार्यवाही करत नाही, तुम्ही मला सांगणारे कोण, गेटआऊट असे म्हणून अपमानित केले. सोबतच माझ्यासोबत आलेल्या लोकांना सांगितले की, तुम्ही पुन्हा आलात तर मारहाण करून लॉकऍपमध्ये बंद करेल अशी धमकी दिली. पोलीस ठाणे त्यांच्या मालकीचे आहे असा ते आव आणतात. त्यांच्या या वागण्याने आमच्याविरुध्द खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी मला मी गोळीबार करून ऐनकाऊंटर केले आहे, तुम्ही हिशोबात राहा, माझ्यासारखे कोणी वाईट नाही, पोलीस अधिक्षक माझे काही वाकडे करत नाही असे सांगून धमक्या देत आहेत.
अशा भ्रष्ट व मस्तखोर पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची जनतेशी गैरवर्तणूक आणि अरेरावी याची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असा मजकुर सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक प्रदीपकुमार नामदेवराव जोंधळे यांनी आपल्या अर्जात लिहिला आहे.
पोलीस अधिक्षक माझे कांहीच वाकडे करू शकत नाही-इति.श्री अशोकरावजी घोरबांड