नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पुर्णा रोडवरील स्वागत बार ऍन्ड रेस्टॉरंटच्या मालकाला मारहाण करून बारची तोडफोड करणाऱ्या तीन जणांना 9 वर्षानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अशोक धामेचा यांनी सात वर्ष सक्तमजुरी आणि तिघांना प्रत्येकी 2 हजार 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
स्वागत बार ऍन्ड रेस्टॉरंट हे पुर्णा रोडवर स्थित आहे. दि.18 एप्रिल 2013 रोजी सकाळी 10.45 वाजता तिन जण तेथे आले आणि त्यांनी दारुचा आस्वाद घेतला. 480 रुपये बिल झाले. तेंव्हा आम्हाला पैसे मागतोस का आम्ही पैसे दणार नाही असे सांगत हे तिघे निघून गेले. पण दुचाकी क्रमांक एम.एच.26 डी.5484 वर बसून जाण्याअगोदर त्यांना गाठण्यात आले आणि पैसे घेण्यात आले. याच रात्री 8 वाजेच्यासुमारास तिन जण तेथे आणि त्यांनी तलवारीच्या सहाय्याने वेटर, इतर व्यक्ती आणि संदेश भानुदास गिते यांना मारहाण केली. त्यात सर्वांनाच गंभीर जखमा झाल्या.सोबतच बार ऍन्ड रेस्टॉरंटची तोडफोड करून नुकसान केले. संदश गितेच्या तक्रारवरीवरुन भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार गुन्हा क्रमांक्र. 74/2013 दाखल केला.
हा खटला न्यायालयात तब्बल 9 वर्ष चालला. घटनेदरम्यान घटनेदरम्यान 8 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. त्यात सुनिल उत्तमराव कदम (25), अमोल उत्तमराव कदम (38), गोविंद भिमराव वाडेकर (26) सर्व रा.लिंबगाव या तिघांना न्यायाधीश धामेचा यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार पाच वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड तसेच कलम 506 नुसार सहा महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये रोख दंड अशा शिक्षा ठोठावल्या. या दोन्ही शिक्षा आरोपींना एकत्रित भागायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी मांडली. भाग्यनगरचे पोलीस अंमलदार सादीक पटेल यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली.
बिअर बार मालक आणि इतरांनावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या तिघांना पाच वर्ष सक्तमजुरी