नांदेड(प्रतिनिधी)-उपवन संरक्षक कार्यालयात दोन जणांनी धिंगाणा घालून संचिका फेकल्या, कार्यालयाच्या नावास चिखल फासला. या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वन संरक्षक कार्यालयातील अधिक्षक श्री प्रकाश मुरलीधर राजभोज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 मार्च रोजी दुपारी 4.30 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान विजय जगन्नाथ उदगिरे, रा.संतज्ञानेश्र्वर नगर नांदेड आणि दिपक सुभाषराव बोधनकर रा.जोशीगल्ली देगलूर हे दोन आले. कार्यालयात धिंगाना घालून श्रीप्रकाश राजभोज यांना जिवे मारण्याची धमकी दिली, टेबलवरील संचिका फेकल्या, कार्यालयाच्या नावाला चिखल फासले तसेच तुम्ही काहीच काम करत नाहीत असे सांगून संपूर्ण वन नष्ट करण्याची धमकी दिली.
वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 186, 332, 504, 506, 427 आणि 34 नुसार गुन्हा क्रमंाक 96/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे हे करीत आहेत.
वन संरक्षक कार्यालयात धिंगाणा घालणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल