नांदेड(प्रतिनिधी)-30 मार्च रोजी रेल्वे स्थानकाच्या पार्किंग फुथपाथ जवळ एका 70 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. या बाबत वजिराबाद पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.30 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेच्यापुर्वी कधी तरी एक महिला मरण पावल्याची खबर वजिराबाद पोलीस ठाण्यात आली. त्यासंदर्भाने वजिराबाद पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 18/2022 फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 173 प्रमाणे दाखिल केला आहे. या आकस्मात मृत्यूचा तपास पोलीस अंमलदार डी.एस.केंद्रे यांच्याकडे देण्यात आला.
1 एप्रिल रोजी डी.एस.केंद्रे यांनी या अनोळखी मयत महिलेसंदर्भाने शोध पत्रिका जारी केली आहे. अनोळखी मयत महिलेचे वय अंदाजे 70 वर्ष आहे. त्यांचा बांधा सडपातळ आहे. रंग गोरा आहे. उंची 4 फुट आहे. त्यांच्या डोक्यावर पांढरे केस आहेत. मयत महिलेच्या अंगावर लाल रंगाचे ब्लॉऊज आणि पिवळसर रंगाची साडी आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी महिलेला कोणी ओळखत असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात या बद्दलची माहिती द्यावी. तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-236500 आणि पोलीस अंमलदार डी.एस.केंद्रे यांचा मोबाईल नंबर 9970381047 यावर सुध्दा माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.
70 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू ; वजिराबाद पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका