
नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या घरासमोर त्यांच्यावर गोळीबार झाला आहे.दोन युवकांनी हे कृत्य केले आहे.मोठा पोलीस फौजफाटा याबाबत हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
नांदेड शहरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचे घर नाईक नगर भागात आहे.आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ते बाहेरून आपल्या घरी आले.गाडीतून खाली उतरत असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला.हल्ल्यात जखमी झालेल्या संजय बियाणींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोरांनी संजय बियाणाच्या गाडी चालकावर पण हल्ला केला आहे.
घटना घडली त्या ठिकाणी पिस्तुलाच्या जवळपास १० गोळ्या सापडलेल्या आहेत.त्यात काही जिवंत गोळ्या सुद्धा आहेत.पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वात अनेक पोल्सी अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळावर पोहचले आहेत. अनेक ठिकाणच्या सीसीकॅमेऱ्यांची तपासणी करून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत.एकदा ओळख पटली तर हल्लेखोरांना पकडणे सहज शक्य होणार आहे.

