नांदेड(प्रतिनिधी)-4 एप्रिल रोजी दुपारी कॅनाल जवळ दाभड शिवारात 1 लाख 79 हजार 800 रुपयांचा दरोडा पडला होता. सोबतच कालच्या तारखेत भोकर येथील एका शेतात 1 लाख 50 हजार रुपयांचा दरोडा घडला. नागसेननगर नांदेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास केला. ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. अशा एकूण 4 चोरी प्रकरांमध्ये 7 लाख 34 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास झालेला आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकीवर जाणाऱ्या माणसाला रोखून दरोडेखोरांनी त्याच्याकडील 1 लाख 84 हजार 800 रुपये रोख रक्कम आणि 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 1 लाख 79 हजार 800 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. या बातमीला वास्तव न्युज लाईव्हने कालच प्रसिध्दी दिली होती. या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे यांच्याकडे देण्यात आला आहे.
भोकर येथील रुक्मीनी शंकर भुसेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 एप्रिलच्या सकाळी 10 वाजेच्यासुमारास त्यांच्या शेतात पाच जणांनी तिला धमकावून, शिवीगाळ करून तिच्या गळ्यातील 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे बळजबरीने काढून नेले आहेत. भोकर पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 120/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील हे करीत आहेत.
नागसेनगर नांदेड येथे राहणाऱ्या संगीता विश्र्वनाथ सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 आरोपींनी मिळून 16 मार्च 2022 त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडूणन त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिणे रोख रक्कम असा एकूण 4 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजनीगर पोलीसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक देवकत्ते यांच्याकडे देण्यात आला आहे.
ईस्लापूर येथून बालाजी किशनराव मोरे यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 1 एप्रिलच्या दुपारी 12 ते 2 एप्रिलच्या सकाळी 5.30 वाजेदरम्यान त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. ईस्लापूर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक तोटेवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
मागील 24 तासात 7 लाख 34 हजार 800 रुपयांचा ऐवज दरोडेखोर आणि चोरांच्या घशात