नांदेड(प्रतिनिधी)-आपण स्वत: आत्महत्या करण्यापुर्वी एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या 36 वर्षीय पत्नीला कुऱ्हाडीने घाव घालून खून केला आणि नंतर तिच्याच साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार बेळकोणी(बु) ता.बिलोली येथे घडला आहे.
मंगळवार दि.5 एप्रिल रोजी 12 वाजेच्यासुमारास बेळकोणी गावात उघडकीस आलेल्या या दोन मृत्यूंमुळे खळबळ माजली. बेळकोणी गावातील नामदेव नरसींग टोकलवार (40) याने गळफास घेतल्याचे त्यांच्या घरात दिसले. लोकांनी पोलीसांना माहिती दिल्यानंतर घरात गेल्यावर दिसले की, त्यांची पत्नीपण मरुन पडलेली आहे. तिच्या शेजारी कुऱ्हाड आहे. कुऱ्हाडीच्या घावांनी नामदेव टोकलवारने आपती पत्नी रंजनाबाई नामदेव टोकलवार (36) यांचा खून करून नंतर तिच्याच साडीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव, इतर अनेक पोलीस अंमलदार तेथे पोहचले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडली.
आत्महत्या करणाऱ्याने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला