बोरगाव घाटात 7 लाख 70 हजार रुपयांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट तालुक्यात दगडांनी रस्ता अडवून कारमधील लोकांच्या डोळ्यात मिर्ची पाऊडर टाकून 7 लाख 70 हजार रुपये लुटल्याचा प्रकार मौजे बोरगाव घाटातील वळणावर घडला आहे.
4 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता मेहनबान रमेश राठोड हे आपल्या चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.3577 मध्ये बसून मोहपूर गावाकडे जात होते. ते कापसाचा व्यवसाय करतात त्यांनी किनवट बॅंकेतून 7 लाख 70 हजार रुपये काढले होते. आणि जात होते. या बोरगाव घाटातील वळणावर रस्त्यावर समोर दगडे ठेवली होती. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. तेंव्हा आसपासवून लपलेले चार जण बाहेर आले आणि त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या, डोळ्या मिर्ची पाऊडर टाकले. आणि त्यांच्याकडील 7 लाख 70 हजार रुपयांची पिशवी बळजबरीने चोरून नेली. माहूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *