
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांना तात्काळ निलंबित करा असा अर्ज पाच युवकांनी गुरूद्वारा बोर्डाचे चेअरमन भुपिंदरसिंघ मिन्हास आणि नांदेडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे.
नांदेड येथील सचखंड गुरूद्वारा बोर्डावर प्रभारी अधिक्षक पदावर गुरविंदसिंघ वाधवा हे काम करत आहेत. यांनी आपल्या प्रभारी अधिक्षक पदाचा कार्यकाळ सुरू झाल्यापासून स्थानिक लोकांविरुध्द काम केले आहे. भरपूर भ्रष्टाचार केला आहे हे या अर्जात नोंदवतांना त्यांचे निवासस्थान वृध्दाश्रमात आहे तिथे पहिल्यापासून सर्वकाही उपलब्ध असतांना त्यावर 7 लाख रुपये ऐवढा खर्च केला आहे. त्यांच्या कार्यकाळात धार्मिक कार्यक्रमांमध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. आपल्या परवानगीशिवाय जमा असलेल्या सुवर्ण साठा काढून त्यात घोटाळा केला आहे. रणजितसिंह यात्रीनिवास बिना परवानगी तोडले आहे. या यात्रीनिवासातून दर महिना आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न होते. त्याचे नुकसान केले आहे.
गुरूद्वारा बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. कारण कांही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे आवश्यक होते. उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक 1430 मध्ये कोणताही ठोस निर्णय घेवू नका असे लिहिले असतांना मोठे-मोठे निर्णय घेतले जात आहेत. गुरविंदरसिंघ वाधवा हे आपल्या कार्यालयात दररोज दारु पिऊन येतात. त्यांच्या या सवईमुळे अनेक कर्मचारी त्रासले आहेत. या बाबत सुध्दा आपल्या समक्ष अनेकदा तक्रार करण्यात आल्या. परंतू त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. तरी गुरविंदरसिंघ वाधवा यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसुल करावी आणि त्यांना गुरुद्वारा बोर्ड प्रभारी अधिक्षक पदावरुन निलंबित करण्यात यावे अशी मागणी या अर्जात आहे. या अर्जावर जगदीपसिंघ नंबरदार, मनबिरसिंघ ग्रंथी, लखनसिंघ लांगरी, अमरजितसिंघ महाजन आणि प्रेमजितसिंघ शिल्लेदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
