नांदेड(प्रतिनिधी)-सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरिक्षक (ग्रेड पीएसआय) ही कार्यवाही अत्यंत जलदगतीने पुर्ण व्हावी म्हणून अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंगल यांनी 7 एप्रिल रोजी आदेश जारी केल्यानंतर या संदर्भाने स्थापन करण्यात आलेल्या अध्यक्ष सुकाणू समितीच्या आदेशानुसार पोलीस महासंचालकांचे उपसहाय्यक अरविंद जाधव यांनी दि.11 एप्रिल 2022 रोजी होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरसींगमध्ये राज्यातील प्रत्येक पोलीस घटकप्रमुखाच्यावतीने प्रशासकीय अधिकारी किंवा कार्यालय अधिक्षक यांनी उपस्थित राहावे असे आदेश दिले आहेत. यामुळे एएसआयचे पीएसआय होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांना जवकरच न्याय मिळेल असे वाटते.
राज्यात 38169 अशी पोलीस नाईक पदे समाप्त करण्यात आली. ते सर्व आता पोलीस हवालदार होतील. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांच्या पदामध्ये जवळपास 1801ची वाढ करण्यात आली आहे. यामुळे पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती कोटाची संख्या 4869 झाली आहे.त्यामुळे आता 60 टक्के पोलीस शिपाई, 35 टक्के पोलीस हवालदार आणि 5 टक्के सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अशी 100 टक्के मोजणी पोलीस अंमलदारांची करण्यात आली आहे. पुर्नरचनेच्यानंतर राज्यात पोलीस शिपाई 108058, पोलीस हवालदार 51210, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक 17071 आणि पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती कोटा 4869 असे आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ग्रेड पीएसआयच्या कामकाजाला गती मिळाल्यानंतर राज्यातील पुर्नरचनेनंतर पोलीस अंमलदारांची संख्या 181208 अशी झाली आहे.
दि.11 एप्रिल रोजी राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयातून होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरंसींगमध्ये भाग घेतल्यानंतर श्रेणी पेालीस उपनिरिक्षक(गे्रड पीएसआय) या पदाच्या पदोन्नत्या देतांना येणाऱ्या अडचणींवर विचार होईल आणि त्या सर्व अडचणी सोडवल्या जातील म्हणून पोलीस उपनिरिक्षक पदाचे दोन तारे आपल्या खांद्यावर लावण्याचे अनेकांचे स्वप्न लवकरच पुण र्होणार आहे.