नांदेड,(प्रतिनिधी)- रामनवमीच्या दिवशी सायंकाळी मूळ फोटो बदलून तो फोटो फेसबुक या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणाऱ्या एकाला इतवारा पोलिसांनी गजाआड केले आहे.
श्रीराम जन्म दिनी नांदेड शहरात निघालेली मिरवणूक वजिराबाद भागात पोहचली असतांना एका फेसबुक संकेतस्थळावर एडिट केलेला एक फोटो व्हायरल झाला.अनेक जणांनी या व्हायरल फोटोचे स्क्रीन शॉट काढले.अनेक जण पोलीस ठाणे इतवारा येथे पोहचले.याबाबत सोहेलखान अकबरखान रा.छोटी दर्गाह यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी गुन्हा क्रमांक ७३/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अ) प्रमाणे रितिकसिंह ठाकूर विरुद्ध दाखल केला.अत्यंत त्वरित प्रभावाने रितिकसिंह ला अटक करण्यात आली.या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक एम.जे.बेग हे करीत आहेत.
युवकांनो असे एडिट करून आपले फोटो,शस्त्रांसह फोटो आणि व्हिडीओ सामाजिक संकेतस्थळांवर अपलोड करून आपल्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील अशी कृती करू नका.आपलेच भविष्य आपल्याच हाताने दरीत ढकलू नका असे आम्हाला नक्कीच सांगायचे आहे.