
नांदेड(प्रतिनिधी)-रामनवमीच्यादिवशी 70 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या बिमारीला गजाआड करण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे.
दि.10 एप्रिल, रामनवमीच्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास गॅस एजन्सीजवळील रस्त्यावर विठ्ठल शेट्टीबा कांबळे (70) यांना जसप्रितसिंघ उर्फ सोनू बिमारी याने चाकूने दोन्ही दंडांवर आणि डाव्या छातीच्याखाली भोकसून खून केला. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 223/2022 दाखल करण्यात आला होता.
प्रत्येक घटनेचा समांतर तपास करण्याचा अधिकार असणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले पोलीस पथक गुरूद्वारा गेट नं.4 जवळ पाठवले. तेथे पोलीसांनी जसप्रितसिंघ उर्फ सोनु बिमारी गुरमितसिंघ सिध्दू (24) यास ताब्यात घेतले. या सोनु बिमारीवर यापुर्वीचे सुध्दा अनेक गुन्हे आहेत. त्याने केलेला खून हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील हद्दीत असल्यामुळे पुढील तपासासाठी सोनु बिमारीला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, मोतीराम पवार, रुपेश दासरवाड, शेख कलीम, जसवंतसिंघ शाहु यांचे कौतुक केले आहे.
संबंधीत बातमी.
https://vastavnewslive.com/2022/04/11/नांदेड-ग्रामीण-पोलीस-ठाण-35/