डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाविर जयंती आणि बैसाखीनिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त 

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस विभागातर्फे भरपूर मोठा पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला आहे. उद्या दि.14 एप्रिल रोजी नांदेड शहरात आणि जिल्ह्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती , भगवान महाविर जयंती आणि बैसाखी सणाचा हल्लाबोल असे कार्यक्रम आहेत. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्ह्यात दोन अपर पोलीस अधिक्षक 9  पोलीस उपधिक्षक,30 पोलीस निरीक्षक, 178 सहाय्यक पोलीस  निरिक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 1232 पोलीस अंमलदार, 152 महिला पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी, आरसीपीचे 5 प्लॅटून तसेच 800 पुरुष व 200 महिला होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
                       नांदेड शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या मिरवणूका, अनुयायी तसेच जैन बांधवांकडून महाविर चौकात शहरातून दोन मिरवणुका निघणार आहेत. सोबतच बैसाखीनिमित्त हल्ला बोर मिरवणूक सुध्दा निघणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधिक्षकांनी शहरातील कांही मार्ग बंद आणि काही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. त्याचा जनतेने वाप करावा असे आवाहन पोलीस उपविभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *