
नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचे गंठण तोडण्यात आले आहे. भोकर शहरात एक घर फोडण्यात आले आहे. मुदखेड गावातून एक वाहन चोरीला गेले आहे. धर्माबाद येथून एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. कासराळी रस्त्यावरून झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून चोरी झाली आहे. तसेच गुडा महादेव मंदिर भोकर रस्ता येथून पिक चोरून नेण्यात आले आहे. चोरी गेलेल्या सर्व ऐवजाची एकूण किंमत 2 लाख 98 हजार रुपये आहे.
सुषमा व्यंकटराव पाटील या 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेच्यासुमारास ग्रेंड मराठा हॉटेल समोरच्या रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करून घरी जात असतांना दुचाकी क्रमंाक एम.एच.26 3935 वर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण 55 हजार रुपयांचे चोरट्यांनी तोडून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील हे करीत आहेत.
भोकर येथील सईदनगर भागात राहणाऱ्या नामदेव मारोती राचुटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 एप्रिलच्या सकाळी 11 वाजता त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कोणी तरी चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडले आणि त्यातील सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 68 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बाचेवाड अधिक तपास करीत आहेत.
12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास कालीजी देवी मंदिरसमोर उभी असलेली चार चाकी मालवाहतुक गाडी क्रमांक एम.एच.26 बी.ए.2027 ही 80 हजार रुपये किंमतीची गाडी कोणी तरी चोरट्यांनी चोरल्याची तक्रार गाडी मालक चंद्रकांत बालाजी बारतोेंडे यांनी दिली. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
धर्माबाद येथील गणेशनगर भागातून 10 मार्च 2022 रोजी रात्री 10 ते 11 एप्रिल 2022 च्या सकाळी 6 वाजेदरम्यान सुमित संग्राम गुरमे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.24बी.ए.9186 ही 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कारामुंगे हे करीत आहेत.
बिलोली शहरातील ठक्करवाड पेट्रोलपंप कासराळी रोड येथे आपली ट्रक उभी करून नागोराव लालबा सवई हे ट्रक चालक जमीनीवर अंधरण टाकून झोपले होते. 12 एप्रिलच्या रात्री 3 वाजेच्यासुमारास त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये रोख रक्कम आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तीचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 45 हजारांचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
सय्यद अहमद सय्यद फकीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 एप्रिलच्या दुपारी 1 ते 2.30 वाजेदरम्यान भोकर नांदेड रस्त्यावरील गुडा महादेव मंदिरासमोर त्यांच्या घरातील उघड्या शेडमध्ये ठेवलेले लहान-मोठे एकूण 63 धान्याचे कट्टे वजन 4 क्विंटल चार जणांनी दुचाकीवर ठेवून चोरून नेले आहेत. याची किंमत 20 हजार रुपये आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.
