
नांदेड(प्रतिनिधी)-जगाला सत्य, अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महाविर यांनी विश्व कल्याणासाठी घेतलेली मेहनत आजही त्यांच्या जन्मोत्सवदिनी दिसली. नांदेड शहरात महाविर चौकापासून निघालेली मिरवणूक पुन्हा महाविर चौक इथपर्यंत आली आणि अनेकांनी आपले विचार व्यक्त करत भगवान महाविर जन्मोत्सव साजरा झाला.
आज भगवान महाविर यांचा जन्मोत्सव दिन सकाळी वजिराबाद येथील महाविर चौकापासून एक मिरवणूक निघाली ती वजिराबाद चौरस्ता, गांधीपुतळा आणि परत महाविर चौक इथपर्यंत आली. भगवान महाविरांनी वेगवेगळ्या प्रथांना तिलांजली देवून समाजाला एक नवीन अनुशासन, तपश्या आणि संयम राखण्याची शिक्षा दिली होती. जगात सदभावना स्थापन व्हावी यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली होती. आजच्या महाविर जन्मोत्सव समारोहात त्यांचे असंख्य अनुयायी सहभागी झाले होते. महाविर चौक येथील महाविर स्तंभाला नमन करून प्रत्येकाने आपल्या श्रध्दा भगवान महाविरांच्या चरणी अर्पण केल्या. तेथे उपस्थितांनी भगवान महाविरांप्रथीचे विचार आणि त्यांनी जगाला दिलेला संदेश सांगितला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. शहरातील अनेक जैन मंदिरांमध्ये सकाळपासूनच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भगवान महाविरांच्या अनुयांनी या कार्यक्रमात सहभागी होवून भगवान महाविर जन्मोत्सव साजरा केला.
