नांदेड(प्रतिनिधी)-महेबुबनगर येथे गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दि.12 एप्रिलच्या सायंकाळी 7.30 वाजता बिनतारी संदेश यंत्रणेवर माहिती आल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिटमार्शल-2 या पदावर विक्रांत दिगंबरराव देशमुख हे कार्यरत होते. बिनतारी संदेश यंत्रणेने सांगितल्याप्रमाणे विक्रांत देशमुख महेबुबनगर भागात गेले. तेथे शेख अजहर याने तु आमच्यामध्ये कशाला आलास. तुझ्या ठाण्यात तक्रार नाही, तुझे काय काम असे सांगत पोलीसावर हात उचलला. या झटापटीत विक्रांत देशमुखचे नेमप्लेट तुटले. पण तो शेख अजहर पळून गेला. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 129/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बुरकुले यांच्याकडे देण्यात आला आहे.
