तामसात 4 लाख 30 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
दादाराव किशनराव चंदनवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 एप्रिलच्या सकाळी 8.45 ते दुपारी 3 यावेळेदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचे मुख्य कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 4 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक उजगरे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *