लिंबगाव येथे एक दरोड्याचा गुन्हा; परस्पर विरोधात सामुहिक हत्याकांडाची तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-14 एप्रिल रोजी दरोड्याचा गुन्हा घडला अशी तक्रार 16 तारखेला देण्यात आली. तसेच 15 एप्रिल रोजी या गुन्ह्याविरुध्द समांतर तक्रार सामुहिक हत्याकांड घडवले जाईल अशी तक्रार आली.
संजीवनी नेमाजी पोहरे रा.महिपाल पिंपरी ता.जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास संजीवनी पोहरे यांच्या घरात घुसून शिलाबाई संजूकुमार शिंदे, सुरेश प्रल्हाद पवार, दशरथ प्रल्हाद पवार, जॅकी प्रल्हाद पवार, संतोष प्रल्हाद पवार, शिलाबाईची मुलगी आणि शिलाबाईचा जावई आदींनी संजीवनी पोहरेला मारहाण केली. माझ्याविरुध्द सन 2019 मध्ये केलेली केस परत घे नाही तर तुझ्या दोन्ही मुलांना व तुझ्या नवऱ्याला खतम करून टाकतो सोबतच चाकुचा धाक दाखवून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा 2 लाख 3 हजारांचा ऐवज लुटून नेला. संजीवनीची मुले सुमेध पोहरे आणि लंकेश पोहरे हे दोघे दुचाकीवर येत असतांना विठ्ठल पोहरे यांच्या आखाड्यावर सार्वजिक रस्त्यावर त्यांना पण गाठून मारहाण केली. या तक्रारीवरुन लिंबगाव पोलीसांनी 16 एप्रिल रोजी गुन्हा क्रमांक 58/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 395, 323, 504, 506 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे. लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक केजगिर अधिक तपास करीत आहेत.
या घटनेच्या अनुरूप 15 एप्रिल रोजी प्रल्हाद दशरथ पवार याने एक लेखी अर्ज पोलीस ठाणे लिंबगाव येथे दिला आहे. या अर्जात 14 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता तो आणि त्यांचा बंधू संतोष हे दोघे कपड्यांना ईस्त्री करण्यासाठी निळा येथे गेले होते. परत येत असतांना निळा पाटीजवळ गावातील समुध नेमाजी पोहरे, लखन नेमाजी पोहरे या दोन्ही भावांनी आमच्या दुचाकीला कट मारून जातीवाचक उल्लेख करून बोलले. सन 2017 पासून तुम्ही आम्हाला कोर्ट कचेऱ्या लावल्या आहेत. तुम्ही लय माजला आहात, तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे असे बोलत होते. त्यांची आणि आमची दुचाकी चालत चालत पुढे रहिमभाई यांच्या मटन दुकानासमोर आली असता सार्वजनिक रस्त्यावर सुमेध नेमाजी पोहरे, लखन नेमाजी पोहरे, भिमराव अशोक पोहरे आणि नेमाजी पोहरे यांनी हातातील काठी आणि रॉडने आमच्यावर हल्ला केला. त्यात आम्हा दोन्ही भावांना मार लागला. आमचे भांडण माहित झाल्यावर जॅकी पवार, भावजई मंगला पवार आणि भाचा कृष्णा पवार आले असतांना त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. बोलतांना तुमचे सामुहिक हत्याकांड घडू आणा असे ते बोलत होते. या संदर्भाने पोलीस ठाणे लिंबगावमध्ये गुन्हा क्रमांक 57/2022 भारतीय दंड संहितेच्या कलमासह ऍट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *