नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीला गोल्डन मोबाईल नंबर देतो म्हणून त्याच्या खात्यातून 64 हजार 389 रुपये काढून घेवून फसवणूक केल्याचा प्रकार मुखेड येथे घडला आहे.
सुधीर शंकरराव चव्हाण या शेतकऱ्याच्या मोबाईलवर 8817695690 यावरून कॉल आला आणि तुम्हाला गोल्डन मोबाईल नंबर देतो म्हणून मोबाईल क्रमंाक 8719817733 यावर फोन पे द्वारे 64 हजार 389 रुपये टाकण्यास सांगितले. हा प्रकार 28 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 दरम्यान वसंतनगर ता.मुखेड येथे घडला होता. याबाबतची तक्रार 17 एप्रिल रोजी दिल्यानंतर मुखेड पोलीसांनी मोबाईल क्रमांक धारकांविरुध्द गुन्हा क्रमांक 123/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक व्ही.व्ही.गोबडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
गोल्डन मोबाईल नंबर देतो म्हणून 70 हजारांची फसवणूक