
नांदेड(प्रतिनिधी)-18 एप्रिलच्या रात्री अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची शोध मोहिम आणि बेकायदेशीर रित्या वाहनांची तपासणी केली. त्यात कांही युवक मोटारसायकली सोडून पळून गेले.

अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार हे काल पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि त्यांच्या पोलीस अंमलदारांसह विविध भागात तपासणी करत असतांना रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्या लोकांवर कार्यवाही केली. ही कार्यवाही सुरू असतांना कांही युवक 7 दुचाकी गाड्या सोडून पळून गेले. या सात दुचाकी वाहनांना सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठेवण्यात आले आहे. त्या गाड्यांच्या मालकांनी आपली कागदपत्रे दाखवून या गाड्या घेवून जाव्या लागतील.
संजय बियाणी हत्याकांडानंतर पोलीसांनी सुरू केलेली अशा प्रकारची कार्यवाही अत्यंत योग्य आहे. जनतेतून सुध्दा याबदल चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीसांनी नेहमीच असे केले तर रात्रीच्या अंधारात होणाऱ्या गुन्हेगारीवर बरेच मोठे नियंत्रण येणार आहे असे जनतेतील लोक सांगत आहेत.



