नांदेड(प्रतिनिधी)-महिलेच्या अन्यायावर रकाने भरून भरून लिहिणाऱ्या बेघर पत्रकारांनी आपल्या ज्येष्ठ पत्रकाराने एका महिलेला पत्रकार सहवास सोसायटीमधील मोकळ्या जागेवर(ओपन स्पेस) बसवल्यानंतर तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नवीन संचालक मंडळाने केल्याची माहिती हाती आली आहे.
पत्रकार सहवास सोसायटी माननिय श्री.मामा कुलकर्णी यांनी प्रस्तावित केली होती. सुरूवातीला तेच त्या सोसायटीचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या काळात छोट्या-छोट्या घटनांना विसरुन जाण्याची सवय समाजात जास्त प्रमाणात होती. त्यावेळी एका विधवा महिलेने आपली सर्व शेत जमीन विकून कांही पैसे मामा कुलकर्णी यांना दिले आणि नांदेड शहरात माझ्या राहण्याची सोय व्हावी अशी विनंती केली. त्यावेळी मामा कुलकर्णी यांनी या महिलेला पत्रकार अधिवास सहकारी हाऊसिंग सोसायटी मध्ये एक भुखंड दिला. त्या महिलेला एक मुलगा होता. कालांतराने मामा कुलकर्णी पडद्या आड केले आणि पत्रकारांच्या सोसायटीमध्ये नवीन छद्मी पत्रकारांचा शिरकाव झाला. एक दुसऱ्यावर चिखलफेक करण्याशिवाय यांनी कांहीच काम केले नव्हते. पण भुखंडांचा मोठा कारभार हाती आला. त्यामुळे या सर्वांची पत्रकारीता पाण्यात गेली आणि महिला अन्यायावर रकाने भरू-भरू लिहिणारे पत्रकार महिलेच्या विरोधात झाले. पण त्या रणरागिणीने सर्वच पत्रकारांना त्यांची जागा दाखवत भुखंडावरील ताबा सोडला नाही.
त्यानंतर बेघर पत्रकारांच्या सोसायटीतील बेघर पत्रकारांचे बेघर संचालक आता कुरघोडीवर आले. महिलेने केलेल्या अन्यायाच्या उठावाला उत्तर देतांना बेघर पत्रकार सोसायटीच्या बेघर संचालकांनी नवीन लेआऊट तयार केला. या लेआऊटप्रमाणे महिलेच्या ताब्यात असणारा भुखंड हा ओपन स्पेस झाला. तरी पण त्या आईने आपल्या लेकरासह भुखंडावर मांडलेले ठाण सोडले नाही. त्यानंतर दुर्देवाने त्या आईचा मृत्यू झाला अशी माहिती सांगण्यात आली नंतर पुत्र त्या भुखंडाचा अर्थात छदमी पत्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे ओपन स्पेसवरील ताबा सोडला नाही आणि त्यानंतर त्याने तो भुखंड एका व्यक्तीला विकला आणि आता त्या ठिकाणी एक पिठाची गिरणी सुरू आहे.
महिला आणि तिच्यावर होणारे अन्याय लिहिण्याची जबाबदारी असणाऱ्या पत्रकारांनीच महिलेवर केलेला हा अन्याय धक्कादायक आहे. उलट ती रणरागिणीच या पत्रकारांवर भारी ठरली तिने आपल्या मृत्यूपर्यंत या भुखंडाचा ताबा सोडला नाही. तिच्यानंतर तिच्या पुत्राने सुध्दा आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतांना त्या ओपन स्पेसचा भुखंड म्हणून विक्री करार केला. विकणाऱ्यांना पत्रकारांच्या तुलनेत छानपणे समजून सांगितले तेंव्हा त्या खरेदी करणाऱ्याने त्या मुलाला उत्तम प्रतिसाद देत तो ओपन स्पेस खरेदी केला त्यावर आज एक पिठाची गिरणी आहे. गिरणीमुळे पत्रकारांनी शिजविण्यासाठी आणलेल्या धान्याला पिठ तयार करून मिळण्याची सोय अगदी जवळ झाली आहे.
ओपन स्पेस विक्री करता येते काय याचे उत्तर महाराष्ट्र नगर रचना कायद्यात असेल त्याचा अभ्यास जास्त नसल्यामुळे कोणत्या कलमानुसार ही ओपन स्पेस विक्री न करण्याची तरतुद आहे हे लिहिता आले नाही. पण आजही महानगरपालिका, त्यातील अधिकारी, पदाधिकारी ओपन स्पेस विक्री बाबत चौकशी करू शकतात, चौकशी झाल्यानंतर योग्य कायदेशीर कार्यवाही करू शकतात. बनावटपणे ओपन स्पेसची विक्री कोणी केली. त्याची मुळात तरतूद काय आहे याचा अभ्यास होवून या बेघर पत्रकारांवर कार्यवाही होणे आवश्यक आहे. नाही तर नांदेडच्या सर्वसामान्य जनतेला महानगरपालिका, प्रशासनास श्राप देण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही.