नांदेड(प्रतिनिधी)-शहरात 22 एप्रिल रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्र्वर यांच्या आश्वरुढ पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. त्यासाठी कांही वाहतुकीची मार्ग बंद करण्यात आले आहेत आणि कांही पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. जनतेने पर्यायी मार्गांचा वापर करून आपला प्रवास करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले आहे.
नांदेड शहरात 22 एप्रिल रोजी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाजवळ जगतज्योती महात्मा बसवेश्र्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. हा सोहळा योग्यरितीने पार पडावा म्हणून 22 एप्रिल रोजी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेदरम्यान त्या भागातून होणारी वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग सुचवले आहेत.
वाहतुकीकरीता बंद करण्यात आलेले मार्ग
आहिल्यादेवी होळकर चौक आणि मामा चौक येथून म्हाडा कॉलनीतून मॉलकडे येणारी तसेच लातूर फाटा ते जुना मोंढाकडे येणारी संपुर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
जुना मोंढा ते लातूर फाटा मार्गे शहराच्या बाहेर जाण्याकरीता साई कमान, दुधडेअरी मार्ग, लातूर फाटा, पुढे जाण्या-येण्याकरीता चालू राहिल. यात जड वाहनांना प्रवेश बंदी असेल. लातूर फाटा, सिडको, हडको,रमाई चौक (ढवळे कॉर्नर), धनेगाव चौक, वाजेगाव, जुना पुल, देगलूर नाका, रजा चौक, बाफना मार्ग, माळटेकडी मार्ग जाण्या-येण्याकरीता सुरू राहिल. जुना मोंढा ते असर्जन नाकाकडे जाण्यासाठी कौठा पोलीस चौकी, रविनगर कौठा, मामा चौक हा मार्ग पुढे जाण्या-येण्यासाठी सुरू ठेवण्यात आला आहे. या मार्गावर जड वाहनांना प्रवेश नाही. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, दि.22 एप्रिल रोजी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करून आपला प्रवास करावा.
जगतज्योती महात्मा बसवेश्र्वर पुतळा लोकार्पणनिमित्त जनतेने पर्यायी मार्गांचा वापर करावा-प्रमोद शेवाळे