राजकारणी लोक कितपत खरे बोलतात याचा प्रत्यक्ष प्रत्यय जनतेला नेहमीच येतो. निवडणूकीत दिलेल्या अश्वासनाची पुर्तता केली असती तर एस.टी कर्मचार्यांचे हे अंदोलन एवढे चिघळुन सिल्व्हर ओक सारख्या राजवाड्यावर चप्पल व दगडफेक झालीच नसती हे सिल्व्हर ओक वरील हल्ल्याचे अंदोलनकर्त्याचे टोकाचे पावूलच म्हणावे लागेल. जे कायदेशिररित्या योग्य नव्हे, पण निवडणूक व निवडून येण्यापुरते घरोघर जावून खोटे-नाटे बोलून वाट्टेल तसे खोटे बोलून सामान्य जनतेची दिशाभूल करावयाची व एकदा का सत्ता हातात आली की, हो करतो देतो, घेतो म्हणून कायम मतदारांना झुलवत ठेवायचे. हा वर्तमान राजकारणी लोकांचा व्य्वसायीक राजधर्मच झाल्याचे म्हणावे लागेल. आपल्या मराठीत म्हणतात ना खोटे बोल पण रेटून बोलकसेही करुन वेळ काढूपणाचे धोरण अंगीकारुन मतदारांना व सामान्य जनतेला बोटावर फिरवायचे याला प्रामाणिक विवेकी राजकारण म्हणता येणार नाही. एकीकडे गँगस्टार लोकांशी आर्थिक फायद्यापायी कुठेतरी नेहमीच जुळवून घ्यायचे, प्रसिद्ध उद्योगपती तथा गुटका किंग यांच्या सारख्याशी भर कार्यक्रमात मांडीला मांडी लावून बसून वारेमाप माया जमा करायची. पैशाच्या जोरावर सोईचे राजकारण करुन गरिबांना उद्व्धस्त करायचे. सहकार क्षेत्र दंडेल शाहीने ताब्यात घेवून वरचढ राजकारण करुन जनसामान्याला देशोधडीला लावायचे. हे काय दुध का दुध पाणि का पाणि करणार, ही जमात तर आपल्या आर्थिक फायद्यासाठी पाण्यातच दुध घालणार, नुसता बोलाचा भात आण बोलाची कढीच म्हणावी लागेल.सध्या महाराष्ट्रात तिन पक्षाचे खिचडी सरकार सत्तेत आहे कसेही करुन कुठल्याही थराला जावून सत्तेची गणिते जुळवून सत्ता हस्तगत करुन जनकल्याणाचा व विकासाचा डांगोरा पिटवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात वर्तमानातील राजकिय मंडळी नुसती तरबेजच नवून तरर्र-बेजआहेत. सध्या महारविकास आघाडी सरकार मधील दोन मंत्री भ्रष्टाचार व गँगस्टार लोकांशी संबंध असल्यावरुन इडीच्या कार्यवाहीमूळे जेलची हवा खात आहेत. भविष्यात इडी, सिबीआय आयकर विभाग लाचलुचपत खाते यांनी प्रामाणिक पारदर्शी व सद्सद् विवेकबुद्धीने तपास करुन चौकशा केल्या तर महाराष्ट्रासह देशातील 75% आजीव माजी राजकिय पूढारी यांना जेचली हवा नक्कीच चाखावी लागेल. पण सब घोडे बारा टक्के म्हणल्याप्रमाणे कोणी कुणाचे संपुर्ण वस्त्रहरण करत नाहीत कारण या सर्वांना आळीपाळीने जुळवून घेवून शेवटी राजकारण करुन सत्ताहस्तगत करावयाची असते. चौकशीचा फार्स व सबळ पूराव्या अभावी यांची निर्दोष मूक्तता ही होते हे भारतीय लोकशाहीला काळीमा फासणारेच आहे. वेगवेगळ्या यात्रा, रथयात्रा, संवाद यात्रा, काढून शक्ती प्रदर्शन करुन मूळ जनकल्याण व विकासापासून जनतेला कोसो दुर ठेवायचे असे विषयांतर करण्यात येवून जनतेच्या मनात नेहमीच संभ्रम निर्माण करुन मूळ विषयाला बगल द्यायची हा वर्तमान राजकारण्याचा नितीराजधर्मच म्हणावे लागेल. गारुडी जसे वेगवेगळे प्रयोग करुन जनतेचे मन आकर्षित करुन पैसा कमवतात त्यात त्यांची प्रामाणिक अंग मेहनत पोटाच्या खळगीसाठी तरी असते इथे तर चक्क जनतेला उल्लू बनवून आपला उल्लु सिधा करुन घेण्याचा राजकारण हा यांचा एकमेव धंदाच झाल्यासारखे म्हणावे लागेल. म्हणतात ना गुण गायीचे व करणी कसाबाची या उक्तीप्रमाणेफुले, शाहु, आंबेडकराच्या विचाराचा खुळखुळा घेवून अख्खे गावभर डांगोरा पिटायचा व शेवटी खुळखुळाच विकुन खायचा ? हे फुले,शाहु, आंबेडकरांच्या विचाराला शोभणारे नव्हे. फुले, शाहु, आंबेडकरांचा विचार,त्याग, विवेक, स्वाभिमान, प्रामाणिक व पारदर्शीपणाचा विचार यांच्या नावाचा गवगवा करुन स्वार्थी राजकारण करावयाचे हे महाराष्ट्राच्या इतिहसात राजकारण्यांना शोभणारे नव्हे. जर तुम्ही दोषी नसाल व दिलेला शब्द पाळुन राजाकरण करणार असाल तर एवढे का जनरोष व इडीच्या चौकश्याला घाबरता?कर नही तो डर काहे का याउक्तीप्रमाणे हिमतीने व शिवरायाच्या इमानदारीने चौकशीला सामोरे जावून दुध का दुध पाणि का पाणि करा. येणारा काळ खोटी आश्वासने व भुलथापाना बळी पडणारा नक्कीच नाही याचा सर्वच राजकिय पुढर्यांनी सदसदविवेकाने वागुन राजकारण करुन देशाचे व जनतेचे भले करावे त्यातच आपले, जनतेचे व देशाचे भले आहे म्हणूनच दुध का दुध पाणि का पाणि म्हणत बसुन राजकारण केल्यापेक्षा सर्वच चौकश्याना प्रामाणिकपणे पुढे जाऊन राजकारण करावे. उगीचच चौकशी यंत्रणेवर दबाव टाकुन खोटे-नाटे बोलुन जनतेची दिशाभुल करु नये असे सामान्य जनतेला वाटते.
-जयहिंद! लाल सलाम!! इन्क्लाब जिंदाबाद!!!
-कॉ.के.के.जांबकर
नांदेड.मो.नं.8208938865