प्रमोद शेवाळे यांचे जनतेला आवाहन दुचाकी गाड्यांमध्ये बदल करू नका

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीसांनी आपल्या वाहनात बदल करून रस्त्यावर चालविल्याप्रकरणी 9 वाहने जप्त केली होती. त्या सर्व वाहनांची तपासणी करून परिवहन विभागाने 9 वाहनांना मिळून 42 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलीसांनी आपल्या दुचाकी गाड्यांमध्ये बदल करून कर्कश ध्वनीमध्ये त्या गाड्यांचा आवाज तयार करून त्या रस्त्यावर चालविल्याप्रकरणी 9 वाहने जप्त केली होती. ती सर्व वाहने प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासली. मोटार वाहन कायद्याच्या काय-काय चुका त्या गाड्यांमध्ये झाल्या याची माहिती घेतल्यानंतर परिवहन विभागाने त्या सर्व 9गाड्यांना एकूण 42 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या गाड्यांचे क्रमांक आणि दंड पुढील प्रमाणे आहेत.
एम.एच.26 एफ.3866-7 हजार रुपये
एम.एच.26 बी.एच.4211-4 हजार रुपये
एम.एच.26 बी.झेड.7406-1 हजार 500 रुपये
एम.एच.26 बी.एस.5506-2 हजार 500 रुपये
एम.एच.38 वाय.3632-9 हजार 500 रुपये
एम.एच.26 बी.आर.8604-7 हजार रुपये
एम.एच.26 एल.3700-3 हजार 500 रुपये
एम.एच.26 बी.झेड.9746-4 हजार रुपये
एम.एच.26 सी.ए.5533-3 हजार रुपये.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, जनतेतील लोकांनी आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कोणताही बदल करून अशा गाड्या रस्त्यावर चालवून नये. त्यामुळे मोटार वाहन कायद्याचा भंग होतो आणि असे घडले तर असे करणाऱ्या प्रत्येक वाहनावर पोलीस विभाग कार्यवाही करणार आहे.