नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर शिवारातून दोन गायी आणि तीन गोरे असे 60 हजार रुपयांचे पशुधन चोरीला गेले आहे. सोबतच जवळगाव ता.हिमायतनगर येथून एका मोबाईल टॉवरच्या 40 हजार रुपयांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. नांदेड ग्रामीण आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 35 हजार 999 रुपयांचे दोन मोबाईल चोरीला गेले आहेत.
अब्दुल सत्तार अब्दुल हजीज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 एप्रिलच्या सायंकाळी 7 ते 19 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेदरम्यान त्यांचे आणि इतरांचे पशुधन ज्यामध्ये दोन गायी आणि तीन गोरे असे 60 हजार रुपये किंमतीचे पशुधन कोणी तरी चोरून नेले आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस अंमलदार सिंगनवाड हे अधिक तपास करीत आहेत.
मधुकर रमेश गायकवाड यांच्या तक्रारीनुसार 24 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर 1.30 ते पहाटे 6 वाजेदरम्यान मौजे जवळगाव ता.हिमायतनगर येथून मोबाईल टावरच्या 19 बॅटऱ्या एक रेक्टीफायर असा 40 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सिंगनवाड अधिक तपास करीत आहेत.
नवीन कौठा भागातील महाराजा इलेक्ट्रॉनिक्सच्या जवळ सुयोग नरहरी गड्डम यांचा 15 हजार 999 रुपये किंमतीचा मोबाईल 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता चोरीला गेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सदगुरू मोबाईल शॉपीमधून 22 एप्रिलच्या दुपारी 1 ते 1.30 वाजेदरम्यान प्रसाद गजानन वंचेवार यांचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरला आहे. याबाबत वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.
पशुधन, बॅटऱ्या आणि मोबाईल चोरी