नांदेड,(प्रतिनिधी)- पोलिसांबद्दल बहुतांश वेळेत नको रे बाप्पा असे म्हणण्याची वेळ जास्त येत असते.पण पोलीस सुद्धा समाजातील एक भागच आहे.तेव्हा समाजाबद्दल त्यांना प्रेम असतेच. असाच एक प्रेमळ प्रसंग इतवाराचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्यात पहायला मिळाला.पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका ४८ वर्षीय माणसाला पोलिसानी इतवारा पोलीस ठाण्यात आणल्या नंतर त्याच्या सोबत भर उन्हात झाड्याच्या कट्ट्यावर बसून त्याचे दुःख समजून घेणे सोबतच त्याला आत्महत्या करणे किती चुकीचे आहे हे समजून सांगणे हे आम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग्य आला तेव्हा आपल्यासाठी निसर्गाने किती सुविधा तयार करून ठेवल्या आहेत हे जाणवले.
दोन दिवसांपूर्वी एका ४८ वर्षीय माणसाला पोलिसांनी इतवारा पोलीस ठाण्यात आणले.हा आत्महत्या करीत होता असे सांगितले.तेव्हा आपले काम करत करत भगवान धबडगे यांनी त्यास बाहेरच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत बसवायला सांगितले.आपले काम पूर्ण करून भगवान धबडगे कक्षाच्या बाहेर आले.झाडाखाली त्या माणसाजवळ बसले.सर्व पोलीस अमलदारांची परिस्थिती अत्यंत गोधळात जाण्यासारखी झाली.आपल्या घरच्या माणसाला बोलत असल्यासारखे भगवान धबडगे त्या माणसासोबत संवाद साधत होते.त्याचे कुटुंब,त्याचे कामकाज अशी सर्व माहिती घेत होते.त्याच्या कडून त्याच्या मुलाचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यास बोलले.मग मात्र आपल्या सुंदर शब्दात त्यास चांगलीच समज दिली.आपल्या पीएसओ ला संगितले यास बसवून त्याचे लक्ष ठेवा आणि त्याचा मुलगा आल्यावर त्यास मुलासोबत घरी पाठवा.
काय आहे हे,तर आमच्या मते ज्या समाजात आपण जन्म घेतला आहे,त्या समाजाची सेवा करणे हे आपले कर्तव्यच आहे.असे समजून भगवान धबडगे यांनी आपले कर्तव्य पूर्ण करून आपली जबाबदारी दाखवली आहे.या बाबत पोलीस दलातून त्यांना विशेष बक्षीस मिळणार नाही.कोणी कौतुकाची थाप देणार नाही.पण अश्याच छोट्या छोट्या घटनांची दखल होत असतेच आणि त्याचे सुंदर परिणाम सुद्धा दिसतातच.वाह बाह पोलीस निरीक्षक भगवानजी धबडगे.
छोटा मोबाईल चोर
या घटने अगोदर एका छोटासा जवळपास ७-८ वर्षांचा बालक पोलीस ठाणे इतवारा येथे आणण्यात आला होता. त्याने एक मोबाईल चोरला होता.नुसताच चोरला नाही तर त्या मोबाईलचे सिमकार्ड काढून तोडून फेकून दिले होते.आम्ही तेथे पोहचलो.तेव्हा तो छोटा चोर रडत रडत शपथा खात आता मी कधीच चोरी करणार नाही असे सांगत होता.पण पोलीस निरीक्षक भगवान धबडगे त्याला काही बोलतच नव्हते.तो छोटा चोर आम्हाला पण सांगत होता की,मी आता चोरी करणार नाही.तेव्हा आम्हाला काय अधिकार तरीही आम्ही त्यास तुझ्या जेवणाची सोय करतो.येथेच राहा पोलीस तुला चांगले ठेवतील असे सांगत होतो.काहीच न बोलणारे धबडगे काही वेळाने बोलते झाले.त्यांनी आपल्या कक्षातील सीसीटीव्ही त्यास पाहायला लावले.त्यात एक कॅमेरा फिरता होता.त्यात आता तू कोठेही चोरी केली तर मला दिसणार आहे,असे संगितले. तेव्हा तो छोटा चोर म्हणाला मी आता कधीच चोरी करणार नाही.तेव्हा असे करू नकोस पुन्हा बोलत धबडगे यांनी त्या बालकास एक आपल्या खिशातील एक मुद्रा दिली.तसेच घरी थेट आई कडे जाण्यासाठी सांगून त्याला दिलेला निरोप पाहता असे वाटले जी असा भाव सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असतो काय ? शाब्बास भगवानजी शाब्बास.
नाहीतर नेहमीच दिसणारी पोलीस वृत्ती दिसते ती अत्यंत भीतीदायक असते.तुला साहेबानी बोलावले आहे.असे सांगून एखाद्याला पोलीस ठाण्यात घेऊन जातात.त्याला पायऱ्याखाली, भिंतीवर,कानाखाली,कानात,डोक्यांवर आवाज काढतात म्हणे.त्याला चौदावे रत्न असे बोलले जाते.त्यातुन पोलिसांना हवे ते कबुल करून घेतले जाते.असे सांगतात,पण सुदैवाने आम्हाला ते पाहण्याची संधी कधीच उपलब्ध झाली नाही.पण त्याच ठिकाणी भगवान सुद्धा असतोच हि बाब मात्र मनाला सुखावणारी आहे.
