नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आज विषय पत्रिकेतील तीन विषयांना मंजुरी दिली तसेच विविध कामांबाबत सभापती किशोर स्वामी यांनी सुचना दिल्या.
आज दि.26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी आणि शिमिती सदस्यांनी चर्चेनंतर तिन विषयांना मंजुरी दिली. सोबतच शहरातील पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी सुचनाही दिल्या. त्या ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याच्या सुचना कदल्या आहेत. तेथै ही बाब अंमलात आणावी. नाली साफ झाल्यावर त्यातून काढलेला काळ उगीच पडून न राहता. तो त्वरीत प्रभावाने उचलण्याची सोय करावी. बाजारांच्या ठिकाणी रात्री सफाई केल्यानंतर कचरा तात्काळ उचलावा. अनाधिकृत बांधकामाची माहिती घेवून ती बांधकामे नियमानुसार कायम करा. ज्यामुळे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढले. गुंठैवारी विषयी बऱ्याच तक्रारी सदस्यांच्याकडून प्र्राप्त होत आहेत. त्याबाबत सर्व गुंठेवारी प्रकरणे सामान्य नागरीकला त्रास होणार नही याची दक्षता घेवून पुर्ण करावीत. या गुंठेवारी प्रकरणाचा अहवाल स्थायी समितीला 15 दिवसांत सादर करावा. शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांमुळै तुटफुट होणारे नळ, ड्रेनेज, ज्या ठिकणी काम सुरू आहे. त्या ठिकाणी पर्यायी रस्त्याबाबत बोर्ड लावा. रमजान ईदचा सण लवकरच येत आहे. या संदभाृने साफसफाई विद्युत दिव्यांची चोख व्यवस्था ठेवा अशा सुचना सभापतींनी बैठकीत दिल्या.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, सदस्य विरेंद्रसिंघ गाडीवाले, बालाजी जाधव, महेंद्र पिंपळे, अब्दुल हफीज, राजू काळे, अब्दुल अलिम खान, कविता मुळे, ज्योती कदम, सुनंदा पाटील, रेहाना कुरेशी, परहत सुलताना, सलमा बेगम नुरूल्ला खान आणि उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू व अनेक अधिकारी उपस्थित होते.
आज संपन्न झाली मनपाच्या स्थायी समितीची बैठक