ईतवारा पोलीस ठाण्याच्यावतीने ईफ्तार पार्टी

नांदेड(प्रतिनिधी)-सर्व मुस्लीम बांधवांनी अत्यंत उत्साहात आणि आनंदात ईद हा सण साजरा करावा हे सांगतांना पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी उपस्थितांमधील ईतर धर्मियांचा सुध्दा आदर करावा असे प्रतिपादन केले.
पोलीस ठाणे ईतवारा यांच्यावतीने आयोजित इफ्तार पार्टीत प्रमोद शेवाळे बोलत होते. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, निरंजन आश्रमातील महंत दौलतपुरी महाराज, सुरजितसिंघ पुजारी, हैदरभाई, संजयकुमार गिरम, तुलजेश यादव, मोहम्मद खलीलोद्दीन, मसुद खान, मकदुम पाशा, जफर खान, अकबर खान, हॅपी क्लबचे शोयेब आणि त्यांचे सहकारी आदींसह असंख्य लोकांची या इफ्तार पार्टीत उपस्थिती होती. ही इफ्तार पार्टी हैदर फंक्शन हॉल माळटेकडी रोड येथे झाली.

या प्रसंगी पुढे बोलतांना प्रमोद शेवाळे म्हणाले, भारतीय संविधानात प्रत्येकाला आपले धार्मिक सण साजरे करण्याचा पुर्ण अधिकार आहे. हे अधिकार वापरतांना प्रत्येकाने इतर धर्मियांना कोणताही त्रास आपल्या आनंदामुळे होणार नाही हे पाहण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभकामना देतांना या ईफ्तार पार्टीत उपस्थित ईतर धर्मिय व्यक्तींची दखल प्रमोद शेवाळे यांनी घेतली.
या कार्यक्रमात पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, सदाशिव गुट्टे, जगदीश भंडरवार, भगवान धबडगे, सुधाकर आडे, सन्माननिय श्री. अशोकरावजी घोरबांड साहेब, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्त्येपोड, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, रमेश गायकवाड यांनी आगंतुकांचे स्वागत केले. ईतवारा पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अंमलदारांनी या ईफ्तार पार्टीच्या आयोजनात मेहनत घेतली.
