शर्मा ट्रॅव्हलच्या गाडीने दुचाकीला दिली धडक; एक महिला ठार दोन पुरूष गंभीर जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-शर्मा ट्रॅव्हल्सच्या गाडीने तीन जणांना धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना 26 मार्च रोजीच्या सकाळी 11.30 वाजता घडली.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 एप्रिलच्या सकाळी 11.30 वाजता माळटेकडी पुलाकडून नमस्कार चौकाकडे येतांना शर्मा ट्रॅव्हल्सच्या गाडीने अपघात झाल्याची माहिती विमानतळ पोलीसांना प्राप्त झाली. पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, पोलीस उपनिरिक्षक गौड, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बाबा गजभारे, पोलीस अंमलदार कानगुले, दारासिंग राठोड, बंडू कलंदर, गंगावरे यांनी त्वरीत घटना घडली त्या ठिकाणी पोहचले. त्या ठिकाणी माला पेट्रोपंपातून एम.एच.26 ए.जी.6725 या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून दुचाकी बाहेर आली तेंव्हा शर्मा ट्रॅव्हलची नांदेड-इंदौर ही गाडी क्रमंाक एम.पी.30-पी.0430 या गाडीने त्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत इंदुबाई शिवानंद डांगे (25) रा.जवळा ता.मुदखेड यांचा मृत्यू झाला. तसेच शिवानंद मारोती डांगे (30) रा.जवळा आणि चंद्रकांत गोविंदराव मोरे (31)रा.त्रिकुट हे दोन गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर पोलीसांनी अत्यंत जलदगतीने त्या ठिकाणी आस्थाव्यस्थ झालेली वाहतुक वळणावर आणली. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. वृत्तलिहिपर्यंत या अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *