‘स्वारातीम’ विद्यापीठाची खेळाडू सोनल सावंत यांना अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पावर लिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची महिला खेळाडू सोनल सुनिल सावंत यांनी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पावर लिफ्टींग क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. या विद्यापीठामधून या क्रीडा प्रकारामध्ये सोनल ही पहिली खेळाडू आहे जिने आखिल भारतीय स्थरावर रौप्य पदक मिळविले आहे.

दि.२० ते २४एप्रिल दरम्यान राजस्थानमधील उदयपूर येथील जनार्दन रॉय नागर विद्यापीठामध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवर लिफ्टींग क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये ४६२.५ किलो वजन सोनलने उचलुन दुसरा क्रमांक मिळविला. अटीतटीच्या या लढतीत तिने स्क्वेट मध्ये १८२.५ किलो,बेंच प्रेसमध्ये १२५ किलो आणि डैड लिफ्टमध्ये १५५किलो असे एकूण ४६२.५किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले. सोनलचे प्रशिक्षक डॉ. नितेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी तिने केली आहे. लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाची सोनल सावंतने यापूर्वीही मुंबई विद्यापीठामधील क्रीडा महोत्सवामध्ये याच क्रीडा प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले होते.

या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंहबिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, वित्त व लेखा अधिकारी आनंद बारपुते, अधिष्ठाता डॉ. एल.एम वाघमारे, डॉ. वैयजंता पाटील, डॉ. वसंत भोसले, डॉ. अजय टेंगसे, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार आणिक्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य यांनी सोनल सावंतचे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *