9 वर्षाच्या बालिकेसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या 21 वर्षीय युवकाला सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-खारीमध्ये आपल्या नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 21 वर्षीय युवकाला अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 3 वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 9 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार दि.3 ऑगस्ट 2015 रोजी दुपारी 1 वाजता शाळेचे मध्यांतर झाले. तेंव्हा ती 9 वर्षाची बालिका शाळेशेजारी असलेल्या एका शेताच्या खारीत आपल्या नैसर्गिक विधीसाठी गेली. त्यावेळी व्यंकटेश उर्फ पप्पु रामकिशन पुयड (21) याने त्या बालिकेला पकडून तिच्यासोबत अभद्र व्यवहार करतांना तिच्या कपड्यावर हात घालून कपडे काढले. अचानक झालेल्या हल्याने ती बालिको ओरडली तेंव्हा आसपासची मंडळी पळत आली. तेंव्हा व्यंकटेश उर्फ पप्पु पुयडने त्यांना सुध्दा मारहाण केली. बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुनहा क्रमांक 195/2015 दाखल केला. आरोपी व्यंकटेश उर्फ पप्पु पुयडला अटक करुन तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक परशुराम मराडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात हा विशेष पोक्सो खटला 31/2015 प्रमाणे सुरू झाला.
न्यायालयात 9 वषाच्या बालिकेसह एकूण 9 जणांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध झालेल्या पुराव्या आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी बालिकेसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या व्यंकटेश उर्फ पप्पु रामकिशन पुयडला भारतीय दंड संहितेच्या कलम 354(ब) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 7 प्रमाणे एकत्रित तीन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. सौ.एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी बाजु मांडली. नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार फयाज सिद्दीकी यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *