नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएचडी करण्यासाठीची पेट परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही २७ एप्रिल पर्यंत होती. ती आता दि. ५ मे पर्यंत वाढवून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पेट मधून सुट मिळण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मूळ प्रत सादर करण्याची अंतिम तारीख ही १० मे करण्यात आलेली आहे.
पेट परीक्षेसाठी अर्ज करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी बदलेल्या तारखेबाबतची नोंद घ्यावी. असे आवाहन पदव्युत्तर विभागाचे सहा. कुलसचिव पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी केले आहे.