‘स्वारातीम’ विद्यापीठास मधुमेह औषधावर पेटंट

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामधील प्रो. शैलेश वढेर आणि त्यांच्या टीमने मधुमेह बरा होण्यासाठी एक शोध लावला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पेटंट मिळाले आहे. हे औषध अगदी माफक दरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अगदी सामान्य रुग्णांना हे परवडणारे आहे.

आजकाल मधुमेह हा सामान्य विकार झाला आहे. कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड हे मधुमेह विरोधी औषध आहे. व्यावसायिक दृष्ट्या कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड लिपीड खूप महाग आहे. यासाठी कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड वाहक प्रो. शैलेश वढेर यांच्या टीमने तयार केले आहे.

कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड लिपीड वाहक सामान्य पाण्यात विरघळणारे औषध आहे. कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड ची विद्राव्यता आणि जैवविविधता वाढविण्यासाठी डिझाईन तयार करण्यात आलेले आहे. यासाठी प्रो. शैलेश वढेर यांच्या टीममध्ये डॉ. सुरेंद्र गट्टाणी, आणि डॉ. श्रद्धा एस. तिवारी यांचा समावेश आहे.

या त्यांच्या अतुलनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी डॉ. शैलेश वढेर व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *