नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या संचालनालय लेखा व कोषागारे कार्यालयाचे संचालक वैभव राजेघाटगे यांनी आपल्या एका पत्रात ईद हा राष्ट्रीय सण असल्याचे लिहुन पारीत केलेले पत्र आज चर्चेचा विषय झाले आहे.
संचालक लेखा व कोषागारे, वित्त विभाग या कार्यालयाचे संचालक वैभव राजेघाटगे यांनी 27 एप्रिल 2022 रोजी एक पत्र जारी केले. या पत्राचा जावक क्रमांक 137 आहे. हे पत्र अधिदान व लेखा अधिकारी मुंबई, राज्यातील सर्व जिल्हा कोषागारे आणि सर्व उपकोषागारे या कार्यालयांना पाठविण्यात आले आहे. माहे एप्रिल 2022 चे वेतन देयक मे 2022 मध्ये एप्रिल महिना संपण्यापुर्वी 3 ते वेतन देयक अदा करण्याची सुचना करण्यात आली आहे. यासाठी माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत गोविंदराव देशपांडे यांनी विनंती केली होती. या पत्रात ईद हा राष्ट्रीय सण आहे तो 3 मे 2022 रोजी साजरा होणार आहे. 1 मे ही महाराष्ट्र दिनाची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे एप्रिल महिना संपण्याअगोदर वेतन प्रदान करण्याची सोय व्हावी म्हणून हे पत्र निर्गमित करतांना मुंबई व राज्यातील सर्व कोषागार अधिकाऱ्यांनी त्याचे नियोजन करुन दक्षता घ्यावी असे आदेश या पत्रात आहेत.
संचालक लेखा व कोषागारे कार्यालय यांचे संचालक वैभव राजेघाटगे यांनी ईद हा राष्ट्रीय सण असल्याचे नमुद करून नवीन चर्चेला रान मोकळे करून दिले आहे. ईद हा धार्मिक सण आहे. राष्ट्रीय सणांच्या यादीमध्ये ईद या सणाचे नाव नाही आहे. कोषागार कार्यालयाने गडबडीत किंवा कांही तरी चुकीने असे उल्लेखीत केलेले आहे. यावर वाद करण्याऐवजी या विषयाला न ओढलेले बरे असे मत व्यक्त होत आहे.