नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका चोरट्याला पकडून त्याच्या कडून ३ लाख ३९ हजार रुपये किंमतीच्या विविध कंपन्यांच्या सहा दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२२ बाबत शिवाजीनगरचे पोलीस शोध घेत असतांना २६ एप्रिल रोजी त्यांनी फैसल चाऊस चालेह चाऊस (१९) रा.मगदुमनगर नवी अबादी नांदेड या युवकाला ताब्यात घेतले. त्या युवकाकडून पोलीसांनी विविध कंपन्यांच्या सहा दुचाकी गाड्या ज्यांची किंमत ३ लाख ३९ हजार रुपये आहे. ह्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार जी.आर.मठदेवरु आणि संदीप राठोड यांच्याकडे आहे.
एकाच व्यक्तीकडून सहा दुचाकी गाड्या जप्त करणार्या पोलीस पथकातील लोकांचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांनी कौतुक केले आहे. ही कामगिरी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, आर.पी.मोरे, पी.बी.राठोड, देवसिंग सिंगल यांनी पुर्ण केली.