तळणीच्या सुर्यवंशींनी नांदेडमध्ये टाकला दरोडा

अर्ध्या तासातच भाग्यनगर पोलीसांनी दरोडेखोर जेरबंद केले

न्यायालयाने पाठवले पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या कॅनॉल रोडवरील भारत ऍक्वेरीएमसमोर 27 एप्रिल रोजी रात्री 9.45 वाजता तळणी येथील तीन सूर्यवंशींनी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकल्याचा प्रकार घडला आहे. तीन्ही आरोपींना पोलीसंानी अटक केली आहे.पकडलेल्या तीन दरोडेखोरांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी 1 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
विपीन कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.27 एप्रिल 2022 रोजी रात्री 9.45 वाजता ते कॅनॉल रोडवर आपल्या मित्रांसोबत वॉकींग करत असतांना तीन दरोडेखोर आले आणि त्या दरोडेखोरांनी त्यांना आणि त्यांच्या मित्रांना चाकुचा धाक दाखवून 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि विपीन कुलकर्णी यांच्या खिशातील 3 हजार ते 3200 रुपये बळजबरीने काढून घेतले.
भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी त्वरीत हालचाल करून तीन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांची नावे ओमकांत उर्फ गोलु चांदोजी सूर्यवंशी (23), कृष्णा उर्फ कान्हा संभाजी सुर्यवंशी (24) आणि साईनाथ गोविंद सुर्यवंशी (18) सर्व रा.तळणी ता.जि.नांदेड अशी आहेत. भाग्यनगर पोलीस ठाण्यात या तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 149/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 सह भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे यांच्याकडे देण्यात आला.आज दि.29 एप्रिल रोजी विजयकुमार कांबळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी या तिन्ही दरोडेखोरांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश एम.बी.कुलणर्की यांनी तिघांना 1 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या कॅनॉल रोडवरील भारत ऍक्वेरीएमसमोर 27 एप्रिल रोजी रात्री 9.45 वाजता तळणी येथील तीन सूर्यवंशींनी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकल्याचा प्रकार घडला आहे. तीन्ही आरोपींना भाग्यनगर पोलीसांनी अर्ध्या तासातच अटक केली आहे.पकडलेल्या तीन दरोडेखोरांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी 1 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
विपीन कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.27 एप्रिल 2022 रोजी रात्री 9.45 वाजता ते कॅनॉल रोडवर आपल्या मित्रांसोबत वॉकींग करत असतांना तीन दरोडेखोर आले आणि त्या दरोडेखोरांनी त्यांना आणि त्यांच्या मित्रांना चाकुचा धाक दाखवून 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि विपीन कुलकर्णी यांच्या खिशातील 3 हजार ते 3200 रुपये बळजबरीने काढून घेतले.
भाग्यनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील,पोलीस अंमलदार बोरकर,सातारे,कळणे,पठाण यांनी घटना कळताच तिकडे धाव घेतली आणि तीन दरोडेखोरांना अर्ध्या तासातच झडप घालून पकडले. त्यांची नावे ओमकांत उर्फ गोलु चांदोजी सूर्यवंशी (23), कृष्णा उर्फ कान्हा संभाजी सुर्यवंशी (24) आणि साईनाथ गोविंद सुर्यवंशी (18) सर्व रा.तळणी ता.जि.नांदेड अशी आहेत. भाग्यनगर पोलीस ठाण्यात या तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 149/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 सह भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे यांच्याकडे देण्यात आला.आज दि.29 एप्रिल रोजी विजयकुमार कांबळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी या तिन्ही दरोडेखोरांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश एम.बी.कुलणर्की यांनी तिघांना 1 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *