जीवघेणा हल्ला करणाऱ्या पाच जणांना 4 मे पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयात वाद सुरू असतांना शेतावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतांना जीवघेणा हल्ला करणाऱ्या जांभळा ता.हदगाव येथील घटनेत पाच जणांना हदगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुविधा पांडे यांनी 4 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बाबूराव माणिकराव शेट्टे यांच्या जांभळा ता.हदगाव येथील शेतावर बेकायदा कब्जा करण्यासाठी आलेल्या जमावाने त्यांच्यासह अनेकावर जीवघेणा हल्ला केला. याबाबत मनाठा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 307 सह विविध कलमानुसार गुन्हा क्रमांक 83/2022 दाखल झाला. मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण हे याबाबत तपास करीत आहेत. विनोद चव्हाण यांनी या प्रकरणी धनराज बाबूराव सोनटक्के (28), गजानन डाखोरे (24), माधव पुजाजी डोखोरे(28), कोंडबा मारोती डाखोरे (25), राजू कोंडीबा डाखोरे (25) रा.सर्व जांभळा ता.हदगाव या पाच जणांना अटक केली. आज 30 एप्रिल रोजी हदगाव न्यायालयात हजर करण्यात आले. सहाय्यक सरकारी वकील ऍड.गिरीश मोरे यांनी पोलीस कोठडीसाठी मांडलेली बाजू लक्षात घेवून न्यायाधीश सुविधा पांडे यांनी पाच जणांना 4 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *