नांदेड जिल्ह्यातील 1अधिकारी आणि 11 पोलीस अंमलदारांचा समावेश
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरातील 800 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले आहेत. सर्व सन्मानप्राप्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचे पोलीस महासंचलाक रजनिश सेठ यांनी अभिनंदन करून भविष्यातील कामकाजासाठी शुभकामना दिल्या आहेत. या यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील 1अधिकारी आणि 11 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.
पोलीस महासंचालकांनी सन 2021 या वर्षाकरीता राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचलाकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती आणि पोलीस अंमलदार दिनेश रामेश्र्वर पांडे, दत्ता रामचंद्र सोनुले, समिर खान मुनिर खान पठाण, शेख चॉंद शेख अलीसाब,संभाजी सुर्यकांत गुटे, गंगाराम हणमंतराव जाधव, राजेंद्र राजलिंग सिटीकर, शिवहर शेषराव किडे, दिपक रघुनाथ ओढणे, दिपक दादाराव डिकळे, दिपक राजाराम पवार यांचा समावेश आहे. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त करणाऱ्या पोलीस अंमलदारांचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, विक्रांत गायकवाड, सचिन सांगळे, पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, द्वारकादास चिखलीकर, जगदीश भंडरवार, भगवान धबडगे, डॉ.नितीन काशीकर, सुधाकर आडे, अनिरुध्द काकडे, मोहन भोसले, सोहन माछरे, शिवाजी डोईफोडे, विकास पाटील, अशोक अनंत्रे, अनंत नरुटे, अभिषेक शिंदे आदींसह अनेक पोलीस अंमलदार आणि मित्र परिवाराने त्यांचे कौतुक केले आहे.
पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांनी जारी केलेल्या 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या नावाची संपूर्ण यादी या वृत्तात 20 पाणी यादी पिडीएफ प्रकारात जोडली आहे.
नांदेड जिल्ह्यात कार्यरत आणि नांदेड जिल्ह्यातील अधिकारी झालेल्या कांही अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहेत. महामार्ग रायगडचे पोलीस अधिक्षक तानाजी चिखले, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील पोलीस उपायुक्त भरत तांगडे, सांगली येथील पोलीस उपअधिक्षक अशोक विरकर, चंद्रपुरचे पोलीस उपअधिक्षक सुधीर नंदनवार, औरंगाबाद येथील पोलीस उपनिरिक्षक जगन्नाथ मेनकुदळे, हिंगोलीचे अधिकारी शिवसांब सुर्यकांत घेवारे यांनाही सन्मान प्राप्त झाला आहे.