भोकर (प्रतिनिधी)- १ मे ” महाराष्ट्र दिन ” व ” कामागार दिनानिमित्त ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ.अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. माधव विभुते स्रीरोग तज्ञ यांनी गरोदर मातेची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मातेने Twins (जुळे) मुलगा व मुलगी जन्म दिला तसेच मातेचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली . मातेची व बाळांची तब्येत चांगली आहे.
यावेळी डॉ.अस्मिता भालके भूलतज्ञ,डॉ सागर रेड्डी बालरोग तज्ञ, श्रीमती जीजा भालके अधिपरीचारीका, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, बबलू चरण कक्ष सेवक उपस्थित होते.