नांदेड, (प्रतिनिधी) – नांदेड क्लबचे नाव मोठे आणि दर्शन खोटे असा प्रकार ३० एप्रिल रोजी नांदेड क्लबच्या जल तरणिकेत घडला आहे.जवळपास १२ ते १३ वर्षांची २५ बालके या दुर्घटनेतून बचावली आहेत. जल तरणिकेतील ऍसीड टॅंक फुटल्याने हा प्रकार घडला होता.कोण आहे यासाठी जबाबदार?कोणावर होती दक्षतेची जबाबदारी ? याबाबत आता एखादे नियोजन मंडळ स्थापन करावे लागेल.
दिनांक ३० एप्रिल रोजी नांदेड क्लबच्या जलतरणिकेत जवळपास २५ बालके आपले दररोजचे व्यायाम करीत होती,काही बालके आपल्या पोहण्याच्या कसबाला वाढवत होती.अचानक त्या जल तरणिकेतील ऍसिड टॅंक फुटला याबाबत बालकांना काही कळलेच नाही.पण बालकांना ऍसिड नाका तोंडात जाऊन त्रास होण्यास सुरुवात झाली.तेव्हा नांदेड क्लबच्या व्यवस्थापनाने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले.काही बालकांना माई हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.बालकांच्या पालकांना काही तक्रार न करण्याची तंबी देण्यात आली.कोणी दिली ती तंबी याबाबत नाव समजले नाही.बालके अद्यापही खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्या बालकांचा उपचाराचा सर्व खर्च आम्ही करू असे गाजर त्या बालकांच्या पालकांना दाखवण्यात आले होते.
आज ऍसिड हल्ल्याने ग्रस्त असलेल्या बालकांमधील एकाच्या पालकाने सचिव नांदेड क्लबला अर्ज दिला आहे. त्यात आमची बालके माई हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.त्यांच्या उपचारावर झालेला खर्च देण्यात यावा अशी मागणी या अर्जात आहे.नांदेड क्लबमध्ये बरेच काही चालते. याबाबत प्रसार माध्यमांनी अनेकदा वृत्त प्रकाशित केले आहे.तरी पण कार्यवाही काही कधीच झाली नाही. होणार नाही असेच दिसते.कारण या नांदेड क्लबचे नाव मोठे आणि लक्षण खोटे असाच काहीसा प्रकार नेहमीच घडत असतो. सुदैवाने ऍसिड हल्ल्यात आजारी झालेली बालके मात्र सुखरूप आहेत.यासाठी परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे.
अँसीड स्फोट चूकीची माहीती -डाँ.लक्ष्मीकांत बजाज
आजच्या नांदेड क्लब मधील बालकांवर जल तरणिकेत अँसीड हल्ला या बातमी बद्दल बोलतांना नांदेड क्लबचे सचिव डाँ.लक्ष्मीकांत बजाज यांनी सांगीतले की, जल तरणिकेत अँसीड चा कोणताही स्फोट झाला नाही. जल तरणिकेची निस्सारण वाहिनी साफ करतांना काही तरी गडबड झाली आहे. ज्या बालकांना त्रास झाला त्यांच्यावर उपचार झाले आहेत.सर्व बालके स्वस्थ होवून घरी गेले आहेत. उपचाराची रक्कम आजच हवी असा हट्ट बालकाच्या पालकाने धरला आणि त्यांनी अर्ज देवून तो प्रसार माध्यमांना दीला आहे.नांदेड क्लबची मिटींग घेवून उपचाराचे पैसे देण्याचा सकारात्मक विचार करणार असल्याचे डाँ. बजाज यांनी सांगीतले आहे.