नांदेड(प्रतिनिधी)- स्वतंत्र मराठवाडाच्या संपादकाची हत्या केल्या प्रकरणात रमेश रूख्माजी हातागळे यास मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी 4 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. चाकुने हल्ला करणारा रमेश हातागळेचा मुलगा कृष्णा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दि. 30 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सोमेश कॉलनीमध्ये राहणारे प्रेमानंद जोंधळे हे स्वतंत्र मराठवाडाचे संपादक आपल्या घरी असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रमेश हातागळेचा मुलगा कृष्णा हा घरासमोर वेगवेगळ्या अवस्थेत फिरत होता. त्याच्या घरातील टीव्हीचा आवाज भयंकर मोठा होता. याबाबत प्रेमानंद जोंधळे यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर प्रेमानंद आपल्या घराबाहेर आले आणि मील रोडने पुढे येत असताना टीव्हीएस या दुचाकी गाडीच्या शोरूमसमोर कृष्णा हातागळेने त्यांच्यावर चाकुने हल्ला केला. प्रेमानंद जोंधळेच्या शरीरावर जवळपास चाकुच्या आठ जखमा होत्या. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला.
काल दि. 1 मे रोजी शिवराज जमदडे यांनी कृष्णाचे वडील रमेश रूख्माजी हातागळे (45) यास अटक केली होती. आज दि. 2 मे रोजी रमेश हातागळेला न्यायालयात हजर केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी रमेश हातागळेला 4 दिवस,अर्थात 6 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. भररस्त्यावर प्रेमानंद जोंधळे यांच्यावर चाकुने हल्ला करून गर्दीच्या ठिकाणी दहशत निर्माण करणारा कृष्णा मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. काही महिन्यांपुर्वी कृष्णाने तु सिगारेट का पितोस असे विचारणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा जिवघेणा हल्ला केला होता. त्याला पोलिसांनी जानेवारी महिन्यात न्यायालयात हजर केले होते. म्हणजेच तो काही दिवसांपुर्वीच तुरूंगातून बाहेर आला असेल आणि त्याने जिवघेणा हल्ल्यानंतर जीव घेऊन खून केला आहे.
संबधित बातमी…
https://vastavnewslive.com/2022/04/30/संपादकाची-खंजीरने-आठ-वार/