नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीचा दुसरा हप्ता राष्ट्रीयकृत बँके मार्फत देण्यात यावा,नसता भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चा आंदोलन करेल असे पत्र किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड.रावसाहेब देशमुख यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
ऍड.रावसाहेब देशमुख यांनी दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शासनाने अतिवृष्टी बाबत नुकसान भरपाई जाहीर केली होती.त्या रकमेतील ७४ टक्के रक्कम नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वर्ग करण्यात आली होती.अनुदानाची रक्कम बँकेला प्राप्त झाल्या नंतर ती रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला ३ ते ४ महिने लागले होते.एनडीसीसी बँकेचा व्यवहार संथ व नियोजन शून्य असल्याने शेतकरी अनुदान मिळवताना त्रासला होता.तेव्हा नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांची अनुदान रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करून पुढील अनुदानाचा हप्ता राष्ट्रीयकृत बँके मार्फत शेतकऱ्यांना देण्यात यावा.नसता किसान मोर्चा आंदोलन करेल.