नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या हातावरील दंडावर जखम झाली तर जीव घेणा हल्ला असतो. इतरांना बेशुध्द होईलपर्यंत मार लागला तरी तो साध्या मारहाणीचा प्रकार असतो. अशा पध्दतीचा एक परस्पर विरोधी गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
कांही दिवसांपुर्वी एका पोलीसांच्या हातावरील दंडावर जखम झाली. ही जखम तलवारीमुळे घडली असे फिर्यादीमध्ये लिहिलेले आहे. असे करणाऱ्या त्या व्यक्तीविरुध्द पोलीसांनी बळाचा वापर करत गोळीबार केला. ती गोळी त्यांच्या मांडीत घुसली. त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचार करून काल दि.2 मे रोजी त्याची सुट्टी झाली आणि त्याला चालता येत नाही या सदराखाली न्यायालयाच्या बाहेरच त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात आली अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे असो.
काल दि.2 मे रोजी म्हाडा कॉलनी नवीन कौठा येथे राहणारे बालाजी गंगाराम राजे व्यवसाय वकील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेजारी शिवाजी महाजन यांचे घर आहे. त्या लेआऊटमध्ये 9 फुट रुंद आणि 40 फुट लांब मोकळ्या जागेबद्दल वाद सुरू आहे. ती जागा माझी असतांना इतरांना हस्तांतरीत करण्यात आली असा ऍड.बालाजी राजे यांचा आरोप आहे. 2 मे रोजी सकाळी 7 वाजता त्यांची पत्नी पौर्णिमा झाड-झुड करीत असतांन साईप्रसाद शिवाजी पटणे, योगिता शिवाजी पटणे, माया शिवाजी पटणे आणि शिवाजी महाजन पटणे यांनी त्यांच्या पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण केली. ऍड. बालाजी राजे यांना पण मारहाण झाली. यात दोन्ही पती-पत्नींचे डोके फुटले आहे. बालाजी राजे यांच्या निकटवृत्तीयांनी सांगितले की, बालाजी राज ेयांची पत्नी पौर्णिमा या अद्याप, वृत्तलिहिपर्यंत बेशुध्द आवस्थेत आहेत. या संदर्भाने माहिती घेतली असता ऍड. बालाजी गंगाराम राजे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 363/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323, 504, 34 नुसार चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा जबाब दवाखान्यात दिलेला दिसतो. सोबतच अशीही माहिती प्राप्त झाली की, आज दि.3 मे रोजी योगिता शिवाजी पटणे यांचाही अर्ज आलेला आहे. त्यावरही जवळपास एक सारख्या भारतीय दंड संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल होईल.
अशा प्रकारे जनतेतील माणसाला गंभीर मार लागला तर, ते दवाखान्यात असतांनाही, पत्नी बेशुध्द असतांनाही गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 324 नुसार दाखल होतो. पण पोलीसाच्या दंडावर झालेली जखम सुध्दा जीवघेणी असते म्हणून त्या प्रकारणात भारतीय दंड संहितेचे कलम 307 जोडले जाते. म्हणूनच सांगितले जाते की, “…पोलीस खाते करील तेच होईल.’.
पोलीसाच्या दंडावर मार लागला तर 307 जनतेचे डोके फुटले तरी 324